वायाळ हॉस्पिटल कोलोन हायड्रोथेरेपी व वेलनेस सेंटर चा शुभारंभ.
प्रतिनिधी -अविनाश कास्तोडे.
दि .11 /01/ 2024 रोजी श्री गजानन महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने अमेरिकेसारख्या देशात असणारी कोलोन हायड्रोथेरापी जी भारतात केवळ मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे विदर्भातील एकमेव कोलोन हायड्रोथेरापी सेंटर चिखली शहरामध्ये डॉ. गजानन सोपानराव वायाळ यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून शिरोधारा, नेत्र तर्पण, स्नेह (वेदील मसाज), स्तन (ऑइल मसाज), स्थान सर्व शक्तिपंचळी, कांस्य थाळी मसाज, वजन कमी मशिन्स, मासशी मजबूत मशिन्स, दुखणे कमी मशिन्स, या नवीन सेवांचा शुभारंभ उदघाटक मा खा श्री प्रतापरावजी जाधव मा. आ. सौ श्वेता ताई महाले पाटील, विद्याधर जी महाले , रेखाताई खेडेकर, पंडित दादा देशमुख ( अध्यक्ष न. प. चिखली), नरेंद्र खेडेकर डॉ . प्रतापसिंग राजपूत डॉ. आशुतोष गुप्त, डॉ. रवींद्र कमळस्कर पुरुषोत्तम खेडेकर, राहुल बोंद्रे, डॉ. निलेश गावंडे, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. गजानन पडघान ,डॉ.संदीप वाघ, डॉ. रामेश्वर दळवी . यांच्या उपस्थितीत वायाळ कोलोन हायड्रोथेरपी व वेलनेस सेंटरचा हॉस्पिटलचा शुभारंभ पार पडला. आलेल्या सर्व मान्यवरांचे श्री सोपान एकनाथराव वायाळ, डॉ. गजानन सोपानराव वायाळ डॉ. सौ प्रतीक्षा गजानन वायाळ यांनी सर्वांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चिखली शहरातील मान्यवरांनी तसेच पत्रकार सारंग महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. गजानन वायाळ यांना शुभेच्छा दिल्या.








