एस.टि.परिवहन महामडळाची गाडी थांबा देण्याची मागणी
प्रणित काठोके जळगांव जिल्हा प्रतिनिधी
मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक एस टी बस फेरी ये जायेतांना इच्छापुर बस स्टॅण्ड वर थांबविण्याबाबत इच्छापूर देवी ट्रस्टच्या वतीने एस. टी महामंडळ मुक्ताईनगर आगार प्रमुखांना तसेच मुक्ताईनगर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या मुक्ताईनगर आगार अंतर्गतच्या सर्व बस अगोदर बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापुर’ बस स्टॅण्ड वर येत होत्या परंतु आता
मुक्ताईनगर-इंदौर रोड जो निर्माणाधीन आहे तो आता इच्छापुर बायपास झाला आहे बायपास झाल्यानंतर
महामंडळातील बसेस आता इच्छापुर बस स्टॅण्ड” ला येत नाही नसून हया बसेस यात्रेकरूंना बायपास वरच उतरून देतात त्या मुळे यात्रेकरूना प्रचंड त्रास होत आहे.तसेच प्रवाशांना इच्छापुर गावात जाण्यास लांब पल्ल्याचे होत असल्याने प्रचंड त्रास होत आहे.
तसेच इच्छापुर ह्या गावात श्री इच्छादेवी चे अति प्राचीन मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोक हया मंदिरात दर्शनाला मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु बस फेरी इच्छापूर गावात येत नसल्यामुळे भक्तांना इच्छापुर गावाच्या 2 किमी. दूर अंत रावर उतरविले जात आहे. हया कारणाने लोकांना भरपूर त्रास होत आहे.त्यामुळे सदरील प्रवाशी आणि इच्छादेवी वर श्रद्धा असलेल्या लाखो भाविकांना प्रवास सोयीचा व्हावा यासाठी मुक्ताईनगर आगारातून सुटणाऱ्या सर्व बस फेऱ्यांना इच्छापूर बस स्टॅन्ड वर थांबा मिळावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच ट्रस्ट च्या वतीने मुक्ताईनगर येथील पत्रकारांना देखील स्वतंत्र रित्या निवेदन देण्यात आले आहे.








