लष्कर पोलीस स्टेशन पुणे पोलिसांची धमाकेदार कामगिरी
एम. जी. रोडवरील रात्रीच्या वेळी दुकाने फोडुन कपड्यांची चोरी करणारे पोलीसांच्या जाळ्यात
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
दि. ०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे येथे त्यांचे एम. जी. रोड, कॅम्प, पुणे येथे असलेले मेड फॉर गेन नावाच्या कपड्याचे दुकानातुन रक्कम रूपये ५८,०००/- रूपयाचे महागड्या कपडांची चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, पो.उप. निरिक्षक राहुल घाडगे, पो.उप. निरिक्षक देशमुख, पो. अंमलदार महेश कदम, अतुल गेंगे, सोगनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शिताफीने शोध घेवुन, आरोपी निर्मल सोनार वय. १८ वर्षे रा. नेपाळ याच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
नमुद आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांच्याकडुन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, व इतर गुन्ह्यातील चोरी केलेला एक लॅपटॉप, ए. सी. मध्ये वापरली जाणारी तांब्याच्या धातुची पाईप, चोरी करण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी, व चोरी केलेले कपडयासह एकुण ३,०५,०००/-रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन, सदर आरोपी व विधीसंघर्षित बालकांनी कॅम्प, पुणे परिसरात चोरी झाल्याचे लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं. २०६/२०२५, मा.न्या.स.क.३०५,३३१, (४), लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं ३३४/२०२५, मा.न्या.स.के. ३०५,३३१, (४), लष्कर पोलीस स्टेशन गु.र.नं ०३/२०२६, भा.न्या.स.क.३०५,३३१ (४) असे एकुण तीन गुन्हे उघडकिस आणले आहेत.
सदरची कामगिरी गा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, यांचे सुचनेप्रमाणे पो. उप. निरिक्षक राहुल घाडगे, पो.उप. निरिक्षक देशमुख, पो. अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांनी केली.








