गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊन्ड आरोपीकडून जन भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
दिनांक ०८/०१/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे बरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलीग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नवले पुलाकडून कात्रज कडे येणारे मुख्य रोडचे दरम्यान असलेल्या राजमाता उदयानासमोरील बाजूचे सर्वांस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवून थांबला आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे अभिषेक कैलास दांगट, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ५०७, वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज नन्हे रोड, पुर्ण हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्ट व एक जिवंत राऊंन्डसहीत दिनांक ०८/०१/२०२६ रोजी १२.०५ या मिळून आल्याने त्याचेकडून गावठी यनावटीचा कट्टा व जिवंत राऊंन्ड जप्त करुन त्याचंविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ०३/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शमां साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आयारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारत्तो विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चोधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.








