!!मनातील भावनाचे चिंतन!!आपुलकीचे उत्तम हृदयस्पर्शी शब्द आपल्या मनातील जखम बरी करतात!आपुलकीच्या भावनिक स्पर्शाने मनातील आजार बरा होतो!आपले भावनिक सहवासाने मन निरोगी होते व आपुलकीची साथ मिळाली तरआपण मनाने कधी आजारी पडत नाही!चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतो, पण त्याचा सामना करण्याची शक्ती परमेश्वर त्याला देतो!जीवनात चुका,अपयश,नकार हा आत्मिक प्रगतीचा भाग आहे,कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होत नाही!आपल्याला ज्ञानाने भय नाहीसे होते,तपस्येने उच्च पद प्राप्त होते,गुरू सेवेने ज्ञान प्राप्त होते व योग साधनेने शांती प्राप्त होते!आपलेपणा आधार व वेळ ही खूप मोठी भावनिक संपत्ती आहे!आपल्या वैचारिक वटवृक्षाला कधीच वार्धक्य नसत, कारण त्याच्या पारंबीच हृदयस्पर्शी नात धरतीशी जुळलेलं असत!आपल तारूण्य ही जगण्याची गोष्टआहे त्याची वयाशी सांगड घालू नका,त्यासाठी वयस्कर व्हा वृध्द होऊ नका!आयुष्यात कोणती गोष्ट कधीही कायमची नसते,तिचा काळ संपून जातो किंवाआपली वेळ संपून जाते!आपले जीवन तणावपूर्ण करू नका,नेहमी हसण्यासाठी वेळ काढा,त्यामुळे आयुष्य वर्षात वाढेल!आपण बरेचदा ऐकतो की कोणामध्ये फार भावनिक गुंतू नये,आपण स्वतःला कोणा साठी अडकवू ठेवू नये!आपला भाविनक गुंता होऊ द्यायचा नाही म्हणजे व्यवहार निस्वार्थी पणाने करावा!आपली माया काळजी, प्रेम आपुलकी सगळे आपले भावनिक सहजभाव आहेतं,आपण त्यांना टाळून जगणं सोपं होतं नाही,त्यांना हद्दपार करणं,हे शक्य नसतं व तसे केल तर आपल्याला त्रास होतो!आपले हृदयस्पर्शी वेगळ पणं स्वीकारत व मनाची सीमा रेषा आखून घेत,त्यासोबत जोडले जाताना,एक विचार मनात राहतो,की त्याच सुद्धा विचार क्षेत्र आहे!आपण जबादारीने जगताना कोणाला कायम बांधून ठेवू शकत नाही!आपले मौन वाचिक असले की अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत नाहीत!मौन म्हणजे शून्य, अट्टाहास सोडणे हे सुद्धा मौन आहे!आपल्याला व्यवहारात अश्या अनेक गोष्टी आहेत की, मौन साधता येत,नुसत्या वाचिक मौनाने कार्यभाग साधत नाही,इतर गोष्टीत मौन साधले पाहिजे!आपला आपण सकारात्मक निर्णय घेताना मौन सोडा,विचार विनिमय व दूरदृष्टी लक्षात घेत भावनिक संस्कारी निर्णयाची अपेक्षित!!









