!!प्रगल्भतेचे संस्कारी विचार!! आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्या वर होणारी टिका सहन करावी लागेल!आपली स्तुती आळशी बनवते तर टिका व्यक्तीला सतत जागृत ठेवते!आपल्या वर सतत होणाऱ्या टिकेमुळे आपलं मन हळूहळू खंबीर होते!आपले मन खंबीर होणं हे एका दिवसात होत नाही,तो रोजचा प्रवास असतो,स्वतःला दोष देणे थांबवणे, स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक पडझडी नंतर मदतीला आपण हात देणे हे सगळं हळू घडते! आपल्याला जाणवतं की, परिस्थिती जैसे थे आहे, पण आपण मात्र बदललो आहोत, आपला हाच बदल आपल्या आयुष्याला नवी दिशा देतो!आपले शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे,तर बुद्धीला सत्याकडे,भावनेला माणुसकी कडे,शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण! आपल्या मेहनतीच्या कष्टाचे झाड योग्य पद्धतीने लावावे लागतेअन्यथा घातलेले खत पाणी वाया जाते व मेहनतीचे फळ सुकून जाते!आपल्या समोरचा माणूस मोकळ्या मनाचाआहे की आतल्या गाठीचाआहे हे त्याच्या बोलण्याच्या पद्धती वरून व चेहऱ्याच्या हावभावा वरून लक्षात येते!आपली फक्त विटा रचून भिंत कधी तयार होत नाही त्यासाठी वाळू, सिमेंट, पाणी याची आवश्यकता आहे, तसे फक्त माणसं जोडून नाते तयार होत नाही त्यासाठी आपुलकी, स्नेह, मित्रता, बंधुभाव असावा लागतो!आपल्याला संघर्षातून पळ काढण्यास हजारो कारणे आहेत,पण संघर्ष करताना ठाम राहायला दोन गोष्टीची गरज आहे!आपला स्वाभिमान व हिम्मत या दोन बाबी विकत मिळत नाहीत त्या मूळ रक्तात समाविष्ट असाव्या लागतात!!









