*सांगलीत महिलेचा खून,पती आणि सासरा अटकेत अनैतिंक संबंधाची होती झालर ! सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, शुभांगी सरोदे सांगली जिल्हा प्रतिनिधी. सांगलीमध्ये उत्तर प्रदेश मधील महिलेला आणून सांगलीच्या टाकळीत तिच्या पतीने आणि ासर्याने चारित्र्यांच्या संशयावरून खून करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला होता. टाकळी (ता.मिरज ) येथे कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पत्नीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला वैतागून दुसऱ्या पतीने आपल्या वडिलांच्या मदतीने हा खून केला आहे. नीतू उर्फ शालिनी आकाशी यादव (वय 37 ) रा. उत्तर प्रदेश असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या खून प्रकरणी तिचा दुसरा पती आकाश उर्फ विशाल दिनदयाळ यादव (वय 24) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (वय 55) रा. खुजझी चदवक जि. जौनपुर उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आले आहे. आकाश आणि नीतूची ओळख ही मित्राच्या मदतीने झाली होती. सांगलीच्या टाकळी गावात ते आकाश आणि वडील जनावरांची देखभाल करण्याचे काम करीत होते. त्यामुळे या दोघांनी खून करण्यासाठी टाकळी गावाची निवड केली होती. खूनाच्या या घटनेने सांगली पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली होती. मात्र रेल्वेच्या तिकिटावरून अखेर या खूनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. आणि यामध्ये दुसरा पती आणि सासरा पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या दोघांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सीद पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील महादेव पोवार रणजीत तिपे संकेत मुदगूम प्रमोद साखरपे सुमित सूर्यवंशी अजय पाटील रणजीत जाधव गणेश शिंदे सुनील देशमुख अजित पाटील श्रीधर बागाडी सुशील मस्के इम्रान मुल्ला अतुल मा अतुल माने यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. या तपासातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदारांचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.*








