गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्याकडुन दुचाकी चोरटयास दोन दुचाकीसह अटक.
प्रतिनिधी रणजीत म्हस्के
मा. पोलीस आयुक्त श्री राकेश ओला साहेब अमरावती शहर यांनी आयुक्तालय हददीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड किस आणणेबाबत आदेशीत केल्यावरुन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप चव्हाण यांचे नेतृत्वात पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही केली आहे
दिनांक ०३/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की एक इसम हा समाधान नगर रोडवर बसस्टैंड जवळ चोरीची गाडी घेवुन उभा आहे यावरुन आरोपी नामे मोहम्मद मुदस्सीर उर्फ जकी मोहम्मद युनुस, वय २७ वर्ष, रा. ग्रीन पार्क, वलगांव रोड अमरावती यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की अंदाजे एक वर्षापुर्वी रेल्वे स्टेशन चौकातुन ३५० सी सी लाल काळया रंगाची विनानंबर प्लेट असलेली बुलेट चोरी केल्याची तसेच भुसावळ वरुन एक काळया रंगाची विनानंबर प्लेट ची हिरो होंडा स्प्लेंडर दोन वर्षापुर्वी चोरी केल्याची कबुली दिली वरुन त्याचे ताब्यातुन दोन मोटारसायकल जप्त करून मोटारसायकल चोरीबाबत पोलीस स्टेशन कोतवाली येथील अप क ५२२/२०२५ कलम ३०५ ब बीएनएस प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकिस आणला व पुढील कायदेशीर कार्यवाही करीता आरोपीस पोस्टे कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीचे नाव: मोहम्मद मुदस्सीर उर्फ जकी मोहम्मद युनुस, वय २७ वर्ष, रा. ग्रीन पार्क, वलगांव रोड अमरावती
जप्त मुददेमाल १. एक लाल रंग काळया रंगाची विनानंबर प्लेट असलेली बुलेट मोटारसायकल कि अं १६०००० रु
२. एक काळया रंगाची विनानंबर प्लेट ची हिरो होंडा स्प्लेंडर कि.अं ५०००० रु
असा एकूण २,१०,००० रु मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदर ची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला साहेब, अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली,
पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे साहेब, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे श्री रमेश धुमाळ साहेब, श्री शिवाजी बचाटे साहेब, सपोआ गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री. संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन सोनुने, पोलीस अंमलदार पोहेकॉ दिपक सुंदरकर, जहीर, सचीन बहाळे, छोटेलाल यादव, नापोका अतुल संभे, पोकों सुरज चव्हाण, राजिक रायलीवाले, निखील गेडाम, सागर ठाकरे, निलेश वंजारी यांनी केली आहे.








