नाकाबंदी वेळी वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई
प्रतिनिधी रणजीत म्हस्के
मा.पोलीस अधीक्षक सो.. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये अहिल्यानगर शहरातील प्रत्रकार चौक येथे आचानक नाकाबंदी करुन नाकाबंदी दरम्यान वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली. विना सिट बेल्ट वाहन चालवणे ३. काळी काच २. तसेच विना नंबर प्लेट १०, ड्रंक अँड ड्राईव्ह ३ व मोटार वाहन कायद्याप्रमाणे ४१ केसेस करण्यात आलेल्या असुन १३,४००/- रु दंड रोख वसुल करण्यात आलेला असुन अनपेड दंड ४८,५००/- रु अशी कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची विशेष मोहीम यापुढेदेखील सातत्याने सुरु राहणार असुन मा. पोलीस अधीक्षक साो, अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर पोलीस दल यांचे वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, आपण मोटार वाहन कायदयाचे पालन करुन आपले वाहन चालवावे. सर्व वाहनचालकांनी वाहतुक नियमांच पालन करुन पोलीस दलास सहकार्य करावे.
सदर कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलूबमें, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग यांचे आदेशान्वये शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि/ बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अधिकारी /अंमलदार पोसई आण्णासाहेब परदेशी, ग्रेड पोउनि रविंद्र घायतडक ग्रेड पोउनि मन्सुर सय्यद, सफी. रामराव शिरसाट, सफौ. गणेश आरणे, सफी. संजय घोरपडे, सफौ. रियाज इनामदार पोहवा. गणेश कडर्डीले, पोहवा. विष्णु खेडकर, पोशि, मधुकर ससे, पोशि. राम शिरसट यांनी केली आहे.









