एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई

विना परवाना अग्निशस्त्रे बाळगणा-या रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार व अन्य ०२ गुन्हेगारांना मोटार सायकलसह ताब्यात घेऊन ०६ अग्निशस्त्रे व ०३ जिवंत काडतुसे हस्तगत.

पोलीस स्टेशन संजयनगर

अपराध क्र. आणि कलम

 

गु.र.नं. ०६/२०२६, आर्म अॅक्ट ३,२५ सह महा.पो.का.क.१४२ आणि ३७(१) (३)/१३५ प्रमाणे

गु.घ.ता. वेळ

दिनांक ०३/०१/२०२६ रोजी १६.४० वा.

गु.दा.ता. वेळ

दिनांक ०३/०१/२०२६ रोजी २२.३१ वा.

फिर्यादी नाव

ऋषीकेश दिपक सदामते पोशि/१३४२ नेम-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली

माहिती कशी प्राप्त झाली

पोशि/संकेत कानडे

पोशि/पचन सदामते पोशि/अभिजीत माळकर पोशि/सूरज थोरात

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारच कर यांचे मार्गदर्शानाखाली

पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर स्था. गु. अ. शाखा, सांगली

पोहेकों/संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, प्रकाश पाटील, संदीप गुरव, रणजीत जाधव, उदयसिंह माळी पोशि / संकेत कानडे, पवन सदामते, अभिजीत माळकर, सुरज थोरात, विनायक सुतार, रोहन घरते सायबर पोलीस ठाणे, सांगली कडील अजय पाटील, अभिजीत पाटील

अटक वेळ दिनांक दि. ०३/०१/२०२६. रोजी

आरोपीचे नाव व पत्ता

(१) किरण शंकर लोखंडे वव-२४ वर्षे राहणार-वाघमोडेनगर, कुपवाड ता-मिरज जि-सांगली

(२) अभिजीत अरुण राणे वय ३२ वर्षे राहणार-शारदानगर, कुपवाड रोड, सांगली ता-मिरज जि-सांगली

(३) तुषार नागेश माने वय ३० वर्षे राहणार-लक्ष्मी मंदीर, हाडको कॉलनी, कृपयाड रोड, सांगली ता-मिरज जि-सांगली

(४) पाजी (पूर्ण नाव माहीत नाही) उमराटी गाव पोस्ट-बलवाडी राज्य-मध्यप्रदेश (परागंदा)

जप्त मुद्देमाल

१) ३,६०,०००/- रु किंमतीचे ०६ देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) जु. वा. किं. अं.

२) १,५००/- रु. किंमतीचे ०३ जिवंत काडतूसे (राऊड) जु. वा. किं. अं.

३) ६०,०००/- रु हिरो हॉन्डा स्लॅन्डर एनएक्सजी मोटार सायकल तिचा आरटीओ नंचर MH-10-AV-1827

४,२१,५००/- (चार लाख एकवीस हजार पाचशे रुपये मात्र)गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपलिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई

करण्याचे आदेश दिले होते.

सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकातील पोशि / संकेत कानडे, पवन सदामते, अभिजीत माळकर, सूरज थोरात यांना गोपनिय बातमीदारामार्फत सांगली शहरातील अकुजनगर ते वारणाली कडे जाणारा १०० फूटी रोडवर हद्दपार रेकॉर्डवरील आरोपी नामे किरण शंकर लोखंडे व अन्य ०२ इसम हे पिस्टल (अग्नीशस्त्रे) बाळगून मोटार सायकलसह थांबलेले आहेत अशी माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, यांचे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन रेकॉर्डवरील आरोपी किरण लोखंडे यास व अन्य ०२ इसमांना पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नांव व गांव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे (१) किरण शंकर लोखंडे वय-२४ वर्षे राहणार-वाघमोडेनगर, कुपवाड ता-मिरज जि-सांगली (२) अभिजीत अरुण राणे वय ३२ वर्षे राहणार-शारदानगर, कुपवाड रोड, सांगली ता-मिरज जि-सांगली (३) तुषार नागेश माने वय-३० वर्षे राहणार-लक्ष्मी मंदीर, हाडको कॉलनी, कुपवाड रोड, सांगली ता-मिरज जि-सांगली असे असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर हद्दपार रेकॉर्डवरील आरोपी किरण लोखंडे यास सदर ठिकाणी हजर राहणेबाचत कोणत्याही सक्षम आधिकाऱ्याची परवानगी घेतले नसलेबाबत निदर्शनास आले. त्यावेळी त्या तिघांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे तिघांचे कब्जात एकूण ०६ पिस्टल (अग्नीशखे) आणि ०३ जिवंत काडतूसे (राऊड) व मोटार सायकल मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. सपोनि/जयदीप कळेकर यांनी सदरचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) हे कोणाकडून व कशासाठी आणले आहे यावावत त्यांना विचारणा केली असता, किरण लोखंडे याने सदरचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) हे मी, अभिजीत राणे आणि तुषार माने राहणार-लक्ष्मी मंदीर, हाडको कॉलनी, सांगली यांनी मिळून मे-२०२५ साली उमराटी गाव पोस्ट-बलवाडी राज्य-मध्यप्रदेश येथून पाजी (पूर्ण नाव माहीत नाही) नावाचे व्यक्तीकडून एकूण ०६ पिस्टल (अग्नीशस्वे) समक्ष खरेदी केल्याचे सांगत आहेत. सदरचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) आम्ही जादा दराने विक्री करीता आणलेले आहेत अशी हकीकत सांगितली.

सदरचे सर्व पिस्टल (अग्नीशस्त्रे) ही व जिवंत काडतुसे आणि मोटार सायकल ही पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त करण्यात आलेली आहेत.

सदर आरोपी नंबर (१) ते (४) यांचेचिरुध्द पोशि/ऋषीकेश सदामते यांनी संजयनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम, हद्दपार तसेच मनाई आदेशाचे उल्लघंन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक/भोसले संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link