*वरिष्ठ आयपीएस सदानंद दातेंनी पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला, पोलीस महासंचालकांकडे दोन वर्षाचा कार्यकाळ राहणार! ( मुंबई ) संभाजी गिरीगोसावी प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यांच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्णता: झाला. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी सांगत त्यांना निरोप दिला. रश्मी शुक्ला यांनी आपल्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार आयपीएस अधिकारी सदानंदाते यांच्याकडे सोपविला आहे. सन 1990 च्या आयपीएस तुकडीचे भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे, महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी रश्मी शुक्ला यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील कामाचीही माहिती दिली. सदानंद दाते हे 1990 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. नव्याने पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा आता दोन वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची पोलीस खात्यात ओळख आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) तसेच राज्यांच्या दहशतवाद विरोधी पथकांची (एसआयटी) देखील जबाबदारी दातेंनी सांभाळली होती. सीबीआय आणि सीआरपीएफ मध्ये देखील दातेंनी वेगवेगळ्या पदावर काम केलं आहे. मीरा भाईदर वसई,विरार पोलीस आयुक्तांचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दहशतवाद्यांच्या त्या ग्रेनेडचे शार्पनेल अद्यापही त्यांच्या डोळ्यात आहेत. सहायुक्त म्हणून त्यांनी मुंबई गुन्हे शाखेची तसेच मुंबई सह. पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजीपीचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा असतो. रश्मी शुक्ला यांची निवृत्तीची फक्त पाच महिने आधीं जानेवारी 2024 मध्ये डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यांना 3 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या नियुक्तीनंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचा कार्यकाळ हा आता 2027 वर्षाच्या अखेरपर्यंत राहणार आहे.*








