काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई..
*नाहीतर आम्हाला* *स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर* *यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..*
प्रतिनिधी:-दौलत सरवणकर
तू *उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही* *उंबरठ्याआडच राहिलो असतो.. खिडकीतून* *दिसणार्या टीचभर आभाळात नशिबातील* *अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..*
तू *खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज ‘आशीर्वाद’ जगतो आहोत.. तुझ्या अंगावर फेकले* होते *शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत..*
*तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला..*
*आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!!*
*तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत..*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त*
*विनम्र अभिवादन*









