पाली येथील शांतीवनात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना, दामिनी पथकाचा कारवाईचा दणका.
१५ युवक युवतीवर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दामिनी पथक प्रमूख पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाली येथील शांतीवनात बरेच जोडपे फिरत आहेत व अश्लील चाळे करत आहेत. त्यावरून दामिनी पथक हे शांतीवनाकडे रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर तिथे बरेच जोडपे मिळून आले. त्यांना सर्वांना ताब्यात घेवून दामिनी पथक हे पोस्टे बीड ग्रामीणला आले. त्यांना पोस्टे ला हजर करून १५ युवक व युवतींवर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे .
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत सर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, उषा चौरे, अशोक शिंदे,पोलीस शिपाई योगेश निर्धार सर्व दामिनी पथक व AHTU बीड यांनी केली.








