प्रसिद्ध रील स्टार चंद्रकांत मधुकर होलार .
प्रतिनिधी -सारंग महाजन
चंद्रकांत मधुकर होलार जिल्हा सांगली विटा येथील रहिवासी असून अगदी लहानपणापासून कलेची आवड आहे .2010 ला चंद्रकांत होलार यांच्या वडिलांचे निधन झाले. चंद्रकांत यांना दोन बहिणी असून दोन्ही बहिणीचे लग्न झाले आहे .आईकडे बघायला कोणीच नव्हतं वडिलांच्या निधनानंतर बहिणीने चंद्रकांत व आईला पुण्याला घेऊन आली चंद्रकांत आणि त्यांच्या आईचा सांभाळ दोन्ही बहिणींनी केला . दोन्हीही बहिणीचा संसार छान होता .
कुटुंबाची जबाबदारी लवकर आल्यामुळे चंद्रकांत यांचे कलेकडे दुर्लक्ष झाले. नोकरी आणि घर एवढंच आयुष्य जगत सगळं छान चालू होतं एक दिवस मित्राचा कॉल आला शॉर्ट फिल्म मध्ये रोल साठी विचारणा करण्यात आली रोल जमेल की नाही हे माहित नव्हतं पण मित्रांनी धीर दिल्यामुळे शॉर्ट फिल्म मध्ये पहिल्यांदाच छोटासा रोल केला तिथे वाटलं की आपण कला क्षेत्रात काम करू शकतो आपल्याकडे जे काही चांगला आहे ते समाजाला दिलं पाहिजे .असा विचार करून मागील दीड वर्षापासून इंस्टाग्राम ला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.. वर्षभरातच व्हिडिओ बनवण्यात ग्रोथ होईल असं वाटलं नव्हतं कलेच आवडतं काम असल्यामुळे ते बंद केलं नाही व्हिडिओ बनवतच राहिले व्हिडिओ बनवताना वाटलं की 100 लोक व्हिडिओ पाहतील व्हिडिओ बनवणं चालूच ठेवलं या 100 लोकांनी जरी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कलेकडे पाहिलं आणि त्याहूनही चांगलं घडेल तर आनंदच होईल असं म्हणून काम करत गेलो 100 नंबर च्या जागी लाखो लोक व्हिडिओ बघत आहे चांगल्या प्रतिक्रिया देत आहे लवकरच मिलियन लोक बघतील ही खात्री आहे. पैसा मिळवणं हा हेतू नसून चांगल्या कामामुळे क्षेत्रात नाव व्हावं हीच अपेक्षा असून प्रेरणादायी वक्ता बनायचं स्वप्न आहे लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.










