आजही महाराष्ट्र म्हणतो
कोरोनात आम्हाला वाचवलं,
कारण विठ्ठलावर श्रद्धा ठेवणारे
उद्धव ठाकरे आमच्यासोबत होते. मुंबई प्रतिनिधी :- दौलत सरवणकर कोरोनाच्या अंधारात
जेव्हा माणूस माणसापासून दूर होता,
तेव्हा महाराष्ट्राला मिळालं
विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक असलेलं नेतृत्व — उद्धव ठाकरे.
“विठ्ठल रखुमाई” म्हणत
माणुसकी जपणारा मुख्यमंत्री
महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला.
ना आरडाओरडा, ना श्रेयाची स्पर्धा,
फक्त शांतपणे, ठामपणे काम.
डॉक्टर म्हणजे देवदूत,
हे त्यांनी शब्दात नाही तर कृतीतून दाखवलं.
ऑक्सिजन, बेड, औषधं, उपचार
राजकारण न करता वेळेवर पोहोचवले.
गरिबासाठी शिवभोजन,
कामगारासाठी आधार,
आणि प्रत्येक जीवासाठी संवेदना.
पांडुरंगासमोर हात जोडून
जनतेसाठी लढणारा हा नेता
महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील.
आजही महाराष्ट्र म्हणतो —
कोरोनात आम्हाला वाचवलं,
कारण विठ्ठलावर श्रद्धा ठेवणारे
उद्धव ठाकरे आमच्यासोबत होते.








