एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद करण्याचा संस्थांनचा निर्णय- जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद करण्याचा संस्थांनचा निर्णय- जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

पुणे दि २७ : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भिमाशंकर संस्थानने घेतला आहे, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व श्री. भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने मंदीर ९ जानेवारीपासून पुढे तीन महिन्यासाठी (महाशिवरात्रीचा १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी वगळून) तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि भाविकांच्या सोयी करिता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदीर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार आहे.

सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून, त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे.

नित्य पूजा सुरू राहणार : मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील.

थेट दर्शन बंद : या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही.

प्रवेशावर निर्बंध : बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे.!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link