स्वा. सै. पं. ध. थेपडे विद्यालय म्हसावद येथे सखी सावित्री समिती अंतर्गत मुला मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयी प्रा डॉ.सुधा मधुकर खराटे यांचे व्याख्यान
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे सखी सावित्री समिती अंतर्गत मुला मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य* याविषयी प्रा . डॉ.सुधा मधुकर खराटे (सेवानिवृत्त प्राध्यापक कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यावल) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री जी डी बच्छाव सर होते तसेच व्यासपीठावर एस एन डी टी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गोसावी सर ज्येष्ठ शिक्षिका सौ पी. पी. चव्हाण मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. मगरे सर, विभाग प्रमुख श्री. चिंचोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या फोटोला वंदन करून करण्यात आली त्या नंतर प्रमुख अतिथी मार्गदर्शक प्रा. डॉ.सुधा खराटे मॅडम यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य श्री. जी डी बच्छाव सर आणि गोसावी सर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्यांचा परिचय श्री निलेश पवार सर यांनी करून दिला. आदरणीय डॉक्टर यांनी आपल्या भाषणातून शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयी सखोल माहिती दिली शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम केला पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे मानसिक आरोग्य जपताना बाह्यमन आणि अंतर्मन या दोघांचा सहसंबंध कसा असतो याविषयी सखोल विवेचन केले तसेच सकारात्मक जीवन जगले पाहिजे माणसाने कायम आपल्या अंतर्मनाचा ऐकलं पाहिजे, परीक्षेला सामोरे जाताना ताणतणावापासून दूर राहिले पाहिजे चांगला अभ्यास करा यशवंत व्हा कीर्तीवंत व्हा असेही सांगितले. आदरणीय प्राचार्य श्री जी डी बच्छाव सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे महत्त्वाचे आहेत हे अनेक उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले त्याचप्रमाणे पाया पक्का असेल तर इमारत आपोआप बांधली जाते असेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्रुती पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अनमोल असे सहकार्य केले.









