गर्वी फाउंडेशन कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
बी एस एफ बहुद्देशीय संस्था, सत कबीर बहुद्देशीय संस्था, संकल्प बहुद्देशीय संस्था व उपेक्षित नायक न्यूज यांच्या वतीने कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
साई गजानन मंगल कार्यालय, शेगाव जिल्हा- बुलढाणा येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार व आर्यमेघ सरदार हे होते.
सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक कामाची दखल घेत गर्वी फाउंडेशन चे सर्वेसर्वा अध्यक्ष सारंग महाजन यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये सन्मानित करण्यात आले.अमोल अंबादास जाधव( सोशल वेलफेयर फॉउंडेशन नाशिक) हे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर
विशेष उपस्थिती मध्ये मोनालिसा गोविंद वर्मा (समाजसेविका), मॉडेल ऋतुजा लुटडे,वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार,लोकमत पत्रकार विष्णू गायकवाड,डॉ. शशिकांत मुळे,दिग्दर्शक निर्माता- डी एन इंगळे,सतीश नारायण शिंदे (साहित्यिक),रितिका साळुंखे (प्रसिद्ध मॉडेल),संध्या पहूरकर ( प्रसिद्ध रिल्स स्टार) अमरावती येथील संपूर्ण सरदार फॅमिली हे सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा कु. अश्विनी सांगळे यांनी केले.
आयोजन समिती मधील- कु अश्विनी सांगळे,सौ वैशाली सोनवणे, राजनंदिनी अहिरे, पत्रकार रामभाऊ आवारे, पत्रकार डॉ. शाम जाधव, पत्रकार मुकुंद आव्हाड, पत्रकार ज्योती हंगे, डॉ. रावसाहेब घोडेराव, शिक्षिका प्रीती म्हसदे, शिक्षक दादाराव सुखदाने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.








