काल दि. 21/12/2025 रविवार रोजी *” निरपेक्ष कीर्तन सेवा “* समूहाचा *राष्ट्रीय संवाद मेळावा* आळंदी देवाची येथे इंद्रायणी तीरी वसलेले विश्वशांती केंद्र ,एमआयडीसी शिक्षण समूह पुणे आदरणीय विश्वनाथजी कराड सर ह्यांच्या सहकार्याने पार पडला.त्याप्रसंगी ज्या मान्यवरांच्या हस्ते आळंदी येथील माऊलीच्या सुवर्णकलशाची स्थापना झाली असे आदरणीय डॉक्टर ह.भ.प.नारायण महाराज जाधव,जगद्गुरु तुकोबारायांचे अकरावे वंशज ह.भ.प.डॉ. प्रशांतजी महाराज मोरे,श्री.क्षेत्र आळंदी येथील विश्वस्त एडवोकेट राजेंद्र उमाप सर,सन्माननीय ह.भ.प.रंगनाथ महाराज नाईकडे (आयएफएस अधिकारी महाराष्ट्र राज्य) ह्या सर्वांच्या उपस्थितीत व सहकार्याने मेळाव्याचे उद्घाटन,दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने सकाळचे सत्र पार पडले.
दुपारच्या दुसऱ्या सत्रातील पाच वाजता जगद्गुरु तुकोबारायांचे दहावे वंशज ह.भ.प.डॉ.सदानंदजी मोरे सर ( अध्यक्ष साहित्य व संस्कृती महाराष्ट्र राज्य ) ह्यांच्या सुंदर अशा अमृततुल्यवानीने समारोप पार पडले.
ह्याप्रसंगी *” निरपेक्ष कीर्तन सेवा “* समूहाचे मुख्य प्रवर्तक तथा मुख्य संकल्पक तथा *राष्ट्रीय संवाद मेळाव्याचे* अध्यक्ष ह.भ.प.नाना महाराज कापडणीस.सोयगाव,मालेगाव. उपाध्यक्ष ह.भ.प.निवृत्ती महाराज शिंदे.वलखेड,दिंडोरी, नाशिक.सचिव तथा मुख्य खजिनदार ह.भ.प.साहेबराव महाराज गवळी. अंधानेर, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.सहसचिव ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री.बीड.समूहाचे सर्व जिल्हा खजिनदार तसेच *” निरपेक्ष कीर्तन सेवा “* समूहाचे राज्यभरातून आलेले सर्व सदस्य व आळंदी येथील ह.भ.प.खंदारे महाराज, ह.भ.प.नलावडे महाराज,ह.भ.प.संतोष महाराज सांगळे, ह.भ.प.हनुमान भजनी मंडळ आळंदी,उपस्थित होते.माऊलींच्या कृपाशीर्वादाने इंद्रायणी तीरी सुंदर असा *राष्ट्रीय संवाद मेळावा* संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा.विजयजी बोत्रे पाटील,प्रस्ताविक ह.भ.प.रंगनाथ महाराज नाईकडे व आभार प्रदर्शन ह.भ.प.साहेबराव महाराज गवळी ह्यांनी केले.








