शौर्य समाजरत्न पुरस्कार” महाराष्ट्र पुणे येथील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिकेत अविनाश गायकवाड यांची निवड
प्रतिनिधी -सारंग महाजन
शौर्य समाजरत्न पुरस्कार आयोजित समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या कर्तुत्वान मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पुणे येथील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिकेत अविनाश गायकवाड यांची निवड करण्यात आली. अनिकेत अविनाश गायकवाड उच्चशिक्षित असून( BE.E&TC) लहानपणापासून नृत्याची आवड होती.
रायझिंग स्टार डान्स अकॅडमी चे फाउंडर आहे. युट्युब गोल्ड आणि सिल्वर प्ले बटन अवॉर्ड होल्डर असून इंडिया गॉट टॅलेंट सीजन 4 चे फायनललिस्ट आहे
कलर्स मराठी चॅनल 2 MAD fame आहे. लोकमत चा बेस्ट डान्स इन्स्टिट्यूट अवॉर्ड मिळाला असून बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड 2021-2022 साठी मिळाला आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सिद्धार्थ मल्होत्रा हिमेश रेशमिया आणि इतर सेलिब्रिटी सोबत डान्स केला आहे. अनिकेत अविनाश गायकवाड यांना शौर्य समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेता प्रताप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या असून मित्र मंडळी नातेवाईकांकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे









