थेपडे विद्यालय, म्हसावदला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
आज दिनांक 15 /12 /2025 रोजी सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शिरसोली ता. जि जळगांव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले . यात थेपडे विद्यालयाचा इ ९वी चा विद्यार्थी *अरहम अस्लम पठाण या विद्यार्थ्याने सादर केलेला AI ROBOT या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला*
त्याच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन आदरणीय डॉ. केदारजी थेपडे साहेब यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री .जी .डी. बच्छाव सर , उपमुख्याधापक आदरणीय श्री.एस के.भंगाळे सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री. के.पी.पाटील सर ,शिक्षक प्रतिनीधी श्री. एस. डी. चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक विज्ञान विषय शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









