दादासाहेब फाळके चित्रपट युनियनतर्फे ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड-२०२५’ लवकरच होणार
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
मुंबई, दि. — (प्रतिनिधी): भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज आणि ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड-२०२५’ यावर्षीही भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियनतर्फे जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात रोहिणी हट्टंगडी, विजय पाटकर, अरुण नलावडे, वर्षा दांदळे, गिरीश ठापर, विलास बडे, उस्ताद मकबूल हुसेन खान, सुनील गोडबोले आणि दिलीप सेन, जावेद हैदर, यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, कला आणि सांस्कृतिक योगदानाच्या आधारे या कलावंतांनी दिलेल्या अनमोल कार्याची दखल घेत यंदाचे अवॉर्ड ठरविण्यात आले आहेत.
दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही भारत सरकारकडून नोंदणीकृत संस्था (अजित म्हामुणकर – राष्ट्रीय अध्यक्ष) असून ,अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ‘Appreciation to the Creation’ या उद्दिष्टाने गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत व्यक्तींना प्रोत्साहन देत आहे. २०२५ चा अवॉर्ड सोहळा अधिक भव्य, अधिक समृद्ध आणि कलावंत-केंद्रित करण्याचा युनियनचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या वर्षीचा कार्यक्रम रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सिद्धिविनायक मंदिराजवळ, मुंबई येथे उत्साहात पार पडणार आहे. रसिक, कलावंत आणि नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून ‘Register Now – 81081 48889’ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
चित्रपटसृष्टीतील अनुभवी तसेच नवोदित कलाकारांसाठी हा पुरस्कार एक मोठा सन्मान मानला जातो. दादासाहेब फाळके यांच्या स्मृती कायम ठेवत भारतीय चित्रपटजगताचा जागतिक स्तरावरचा लौकिक वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
युनियनतर्फे पुढील काही दिवसांत आणखी काही नामांकित कलाकारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांना आणि चाहत्यांना कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी युनियनच्या अधिकृत संकेतस्थळाला www.dspcunion.com भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








