कात्रजच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकही राजकीय भाषण न होता केवळ कीर्तन आणि समाजप्रबोधन
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असतानाही एकही राजकीय भाष्य न करता आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कीर्तनाने कात्रजच्या इतिहासात नवा आदर्श निर्माण केला. लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे कीर्तन कात्रज भाजी मंडई येथे पार पडले.
हा कार्यक्रम मा.सुमित काशिनाथ आबा काशिद मित्र परिवार आणि सत्या फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे या कीर्तन सोहळ्यास सर्व पक्षांचे नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, कुटुंबसंस्कार, नैतिक मूल्ये आणि सामाजिक एकोपा यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या विनोदी पण विचारप्रवर्तक शैलीला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
निवडणुकीच्या काळातही राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आणि प्रभाग क्रमांक 38 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मा.सुमित काशिनाथआबा काशिद आणि मा.गीतांजली गोरखनाथ जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रसंगी उपस्थित शहराध्यक्ष मा.प्रशांत जगताप, मा.विलास भणगे, मा.दत्तात्रय धनकवडे, मा.वसंत मोरे, मा.युवराज बेलदरे, मा.अनिल कोंढरे, मा.विकास फाटे, मा.अनिल मांगडे, मा.चंद्रकांत मांगडे , मा.विक्रम भिलारे, मा.पांडुरंग भिलारे, मा.अजय साबळे, मा.दादासाहेब गायकवाड, मा.ऋषिकेश गायकवाड, मा.राणीताई बेलदरे, मा.वनिता जांभळे, मा.सुचेता भालेराव, मा.शिवाजी मुसळे, मा.प्रशांत कांबळे, मा.कांताभाऊ राठोड, मा.विराज सोले, मा.स्वप्निल वेताळ, मा.आदित्य जाधव, मा.आतिश कांबळे आणि मोठ्या प्रमाणात मित्र परिवार उपस्थित होता
विशेष सहकार्य काशिनाथ आबा काशिद आणि स्वप्निल काशिद








