सोम फाउंडेशनच्या वतीने रायगड किल्ल्यावर *हिरकणी* पुरस्कार सोहळा
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
सोम फाउंडेशनच्या अध्यक्षा किर्तीताई कोकाटे ह्या जानेवारी 25 पासून महिलांना सोबत घेऊन 12 महिने 12 किल्ले हा उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाची सांगता हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ह्या दुर्ग किल्ल्यावर हिरकणी पुरस्कार देऊन करण्यात आली. फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा *हिरकणी* पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिताताई गोसावी यांना हा *हिरकणी* पुरस्कार गड किल्ले संवर्धन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा योगेशभाऊ शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे कारण माझे प्रेरणास्थान माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या आणि जिथे भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा झाला अशा पावनभूमीवर मला हा हिरकणी पुरस्कार मिळाला हे माझे परमभाग्य आहे. याच रायगडावर अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. त्यामुळे हा *हिरकणी* पुरस्कार घेताना माझे मन भरून आले. याच रायगडावर हिरकणी बुरुज आहे. म्हणूनच सोम फाउंडेशनच्या वतीने जीवनात संघर्ष करून उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण असे मनोगत योगिताताई गोसावी यांनी व्यक्त केले.
या पुरस्कार सोहळ्यात गड किल्ले संवर्धन प्रदेशाध्यक्ष मा योगेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा समीर धुमाळ, सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स अध्यक्ष मा सचिन देशमुख, पर्यटक निवास सहव्यवस्थापक मा कुमार घाडगे, इतिहास संशोधक व दुर्ग रक्षक मा संदीप तापकीर, गड किल्ले संवर्धन रायगड तालुका अध्यक्ष मा वल्लभ कोकाटे, सोम फाउंडेशनचे उपाध्यक्ष मा युवराज लाहोटी, खजिनदार मा हरीश कोकाटे, रोटरी क्लबच्या पर्णलताई कणेकर, फिटनेस कोच रुपालीताई शेवाडे, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई मोहिते व अश्विनीताई गाडगीळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.









