सुप्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल, डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा विशेष सन्मान प्रमुख पाहणे यांच्या हस्ते केला जाणार आहे. सदर फेस्टिव्हल मध्ये शाळा व कॉलेजमधील विद्यार्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, काव्य वाचन, गीत गायन, अभिनय स्पर्धा, लावण्यवती स्वाती पुणेकर यांचा लावणी महोत्सव कार्यक्रम, बॉडी बिल्डींग, रेकॉर्ड डान्स आणि खास कोकण सुंदरी अशा अनेक स्पर्धा तसेच १४ भाषेत आणि ४५०० हुन जास्त विक्रमी प्रयोग केलेला कौटुंबिक विनोदी नाटक ऑद द बेस्ट, तसेच महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि हास्य टॉनिक भाऊ कदम यांचा सिरीयल किल्लर हा धमाल कौटुंबिक विनोदी नाटकसह अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची अस्सल मेजवाणी खास दर्दी व हौशी रसिक प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. तरी माणगांवात प्रथमच होणा-या या कोकण फेस्टिव्हल – २०२५च्या उद्घाटन सोहळ्यास शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सांय ठिक ६.०० वाजता रायगड कोकणातील सर्व प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक नातं जपणार व्यासपीठचे निमंत्रक व संस्थापक – अध्यक्ष डॉ. अजय आत्माराम मोरे आणि सेक्रेटरी सौ. सौ. अकिता मोरे तसेच कार्याध्यक्ष सौ. प्रमिला हितेन भाई छेडा व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.









