एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हा पुरस्कार २०२५ साठी जिल्ह्यातील सुक्ष्म व लघू उद्योजकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा पुरस्कार २०२५ साठी जिल्ह्यातील सुक्ष्म व लघू उद्योजकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

पुणे दि १० : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या जिल्हा पुरस्काराकरिता पात्र उद्योजकांकडून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी केले आहे.

पुरस्काराचे स्वरुप प्रथम क्रमांकास रुपये १५,०००/- रोख रक्कम व मानचिन्ह, तर द्वितीय क्रमांकास रुपये १०,०००/- रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उद्योग घटकाची उद्यम नोंदणी दिनांक ०१ जानेवारी २०२२ पूर्वीची (किमान तीन वर्षांपूर्वीची) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित सुक्ष्म, लघू उद्योगाने मागील सलग दोन वर्षे उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवलेली असावी. संबंधित उद्योग कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथे विनामूल्य उपलब्ध असून अर्जासंबंधी व पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३७९६६ यांच्याशी संपर्क साधावा.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link