एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कल्हवारी जान्हवीने जे ‘शब्द’ दिले होते ,ते सूरजच्या लग्नाच्या मिरवणुकीत प्रत्यक्ष उतरले!”मी तुझ्या प्रत्येक मोठ्या क्षणी तुझ्या बाजूलाच उभी राहीन

“कल्हवारी जान्हवीने जे ‘शब्द’ दिले होते ,ते सूरजच्या लग्नाच्या मिरवणुकीत प्रत्यक्ष उतरले!”मी तुझ्या प्रत्येक मोठ्या क्षणी तुझ्या बाजूलाच उभी राहीन।

प्रतिनिधी मुकुंद मोरे

‘गुलीगत धोका’ फेम आणि बिग बास मराठीचा विजेता सूरज चव्हाण ज्याचं आयुष्य चढउतारांनी, वेदनेने आणि संघर्षाने भरलेलं. घरात वडिलांचं कॅन्सरने निधन आईला तणावाने रक्ताच्या उलट्या
तीन बहिणींची जबाबदारी ज्या झोपडीत पावसाचं पाणी ओघळायचं, त्या झोपडीपासून आज स्वतःच्या हक्काच्या बंगल्यापर्यंतचा प्रवास हा प्रवास म्हणजे जिद्दीची थेट व्याख्या.

आणि या प्रवासात एक नाव सतत उभं राहतं
जान्हवी किल्लेकर.

हो तीच जान्हवी, जी बिग बॉसच्या घरात सूरजला “भाऊसारखा” म्हणत उभी राहिली होती. तेव्हा तिच्या एका वाक्याने सोशल मीडिया हलला होता
“मी तुझ्या प्रत्येक मोठ्या क्षणी तुझ्या बाजूलाच उभी राहीन.”

ते वाक्य तेव्हा अनेकांना फक्त गेम शोमधला इमोशनल मोमेंट वाटला
पण आज

लग्नाची मिरवणूक निघाली, ढोल-ताशांचा आवाज आकाशात झंकारत होता… आणि त्याच क्षणी ‘कल्हवारी’— सूरजची लाडकी जान्हवी मिरवणुकीत सूरजसोबत ठसकेबाज नाचताना दिसली!

चेहऱ्यावर आनंद, डोळ्यांत अभिमान, आणि चालण्यात भावनांचा थरथरता भार.
सूरजच्या ‘काळोख्या दिवसांत’ सोबत उभी राहिलेली जान्हवी… आज त्याच्या ‘सुखाच्या दिवसा’तही त्याच्या सोबत तेजाने उजळली.

सोशल मीडियावर तर एकच चर्चा
“सूरज जिंकलाय बिग बॉस पण सर्वात मोठा विजय? त्याच्या आयुष्यात अशी कल्हवारी आहे!”

तिच्याशिवाय ही मिरवणूक अपुरीच वाटली असती. सूरज जपून बसवलेली आपली स्वप्नं, आपले संघर्ष, आपली ओळख — त्या सगळ्यांत आज जान्हवीने अगदी बहिणीच्या प्रेमाने आपलं वचन पूर्ण केलं.

उद्या सूरजचा संसार होईल नवजीवनाची सुरुवात होईल…
पण आजची ही मिरवणूक
ही होती ‘संघर्षाची विजययात्रा’.

आणि त्या विजययात्रेत
सूरजच्या उजव्या खांद्यावरून उमटणारी किलबिलती आवाजातली ताकद होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link