नायब तहसीलदार गोरे ताई यांच्या प्रयत्नांन यश.
अखेर ८दिवसापासुन सुरू आसलेले उपोषण मागे..
प्रतिनिधी गोपाल तिवारी
आठ दिवसांचा उपोषणाचा तिडा सोडवण्यासाठी नायब तहसीलदार गोरे ताई व ठाणेदार खैरडे साहेब यांनी बजावली म्हत्वाची भुमीका.
मुंगळा येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर मुंगळा येथील पंडू सहस्त्रबुद्धे नामक व्यक्तीने ८दिवसापासुन सुरू असलेले अन्नत्याग उपोषण अखेर नायब तहसीलदार गोरे मॅडम व मालेगाव चे ठाणेदार गोपाल खैरडे साहेब यांनी सामंजस्याची भुमीका घेऊन उपोषणाचा तिडा सोडविण्यात अखेर यश आले.
सरपंच/ग्रामसेवक यांनी आसलेले अतिक्रमण २५नोव्हेंबर पर्यंत काढु असे लेखी पत्र दिले व उपोषण कर्त्यांना नायब तहसीलदार गोरे मॅडम व सरपंच निताताई राऊत यांनी लिंबू सरबत देऊन उपोषणाचा समारोप केला…
सविस्तर वृत्त असे की मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे अतिक्रमण काढून दिनांक ११ नोव्हेंबर पासून मुंगळा ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषण सुरू होते ग्रामपंचायत कडुन उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु आधी अतिक्रमण काढावे मगच उपोषण सोडेल असा उपोषणकर्त्याचा हट्ट होता अखेर मालेगाव तहसीलचे नायब तहसीलदार गोरे ताई व मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार खैरडे साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावून सामंजस्याने समजावून सांगून उपोषणकर्त्याला आपल्या मागणी पैक्षा आपला जिव महत्वाचा आहे अश्या विविध विषयावर मार्गदर्शन करून आपले उपोषण मागे घ्यावे अशी सूचना केली उपोषण करते पंडू सहस्रबद्दे यांनी मी अतिक्रमण काढावे यासाठी उपोषणाला बसलो आहो मला अतिक्रमण कोणत्या तारखेला काढले जाईल याचे लेखी पत्र देऊन गोरे मॅडम व ठाणेदार साहेब यांनी याची जबाबदारी घ्यावी या अटीखाली मी उपोषण मागे घेण्यास तयार आहो असे सुचवताच ग्रामपंचायतचे सरपंच निताताई राऊत व ग्रामसेवक घुगे यांनी लेखी पत्र तयार करून नायब तहसीलदार गोरे मॅडम व सरपंच निताताई राऊत यांच्या हस्ते लेखी पत्र देऊन अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही तयार आहोत असे सर्वांच्या समोर अस्वासन देताच सूचनेचा आदर करून पंडू सहस्त्रबुद्धे यांनी आपले उपोषण मागे घेतले शेवटी नायब तहसीलदार गोरे ताई यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सर्वांच्या उपस्थितीत ८दिवसा पासुन सुरु असलेल्या उपोषणाचा समारोप करण्यात आला यावेळी पीएस आय राजेश येलगुलवार एपीआय इंगळे साहेब महिला पिएस आय लौढे मॅडम एएस आय गाडे माॅडम पोलीस स्टाॅप यांनी मुंगळा गावाची शांतता अबाधित रहावी यासाठी म्हत्वाची भुमिका बजावली…
नायब तहसीलदार गोरे ताई व ठाणेदार गोपाल खैरडे साहेब यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेतल्याने मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सर्व गावकरी शेवट काय होईल या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी नायब तहसीलदार व ठाणेदार साहेब यांच्या विषयी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले….
सरपंच नितांताई राऊत व ग्रामसेवक घुगे साहेब यांनी उपोषण कर्ते पंडू सहस्त्रबुद्धे यांना २५तारखे पर्यंत ग्रामपंचायत कडुन अतिक्रमण काढले जाईल असे लेखी पत्र व सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत पण तोडी अस्वासन दिल्याने आठ दिवसांपासून सुरू आसलेले उपोषण मागे घेतल्या गेले…..










