कै द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद येथे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
दि 13 नोव्हेंबर 2025 रोजी कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद तालुका जिल्हा जळगाव येथे रंगोउत्सव सेलिब्रेशन लेवल आर्ट स्पर्धा घेण्यात आली होती त्यात शाळेचा चौथा क्रमांक आला. यात थम प्रिंटिंग कलरिंग अँड हॅन्ड रायटिंग अशा तीन .प्रकारच्या स्पर्धा होत्या या शाळेतील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याच विद्यार्थ्यांना 85 पारितोषिक मिळाले तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस एम पिंगळे सर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हसावद गावाचे माननीय सरपंच संजय मोरे होते प्रथमतः सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवन येवले सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना सौ संगीता पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सौ उज्वला सोनवणे मॅडम यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक रिंकू बाविस्कर मॅडम यांनी परिश्रम घेतले. त्यांना सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.









