महेश महाराज मठपती परभणी उपतालुकाप्रमुख यांचे अपघाती निधन
परभणी .श्रीहरी अंभोरे पाटील
महेश रूद्रय्या मठपती यांचे सोमवार रोजी सकाळी साडेचार वाजता हैदराबाद बेंगलोर हायवे रस्त्यावरील नांदियाल जवळ अपघाती निधन झाले असुन महेश मठपती हे परभणी जिल्ह्यातील झरी या गावातील पथम नागरीक म्हणुन अनेक काळ कार्यरत होते.आज शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख परभणी या ठिकाणी कार्यरत आहेत
त्याची परभणी जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील जनतेत त्याची त्याच्या कामामुळे ओळख होती ते जंगम समाजाच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य पन होते व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व झरी गावचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते त्यांनी त्यांच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत विविध पदावर काम केले होते त्यामुळे त्यांची जनसामान्य माणसांमध्ये एक वेगळीच ओळख झाली होती . त्यांचा समाजामध्ये एक वेगळा आदर होता त्यामुळे त्यांची सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी यांच्या सोबत संबंध होते
बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या झरी तालुका परभणी या मुळ गावी त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.सकाळी नऊ वाजता मुळ घरीवरुन त्यांच्या गावातून पार्थिव महादेव मंदिर जगमवाडा येथून निघणार असून दुधगाव फाटा येथे त्यांच्या शेतावरती अंत्यसंस्कार सकाळी दहा वाजता ठेवण्यात आले आहे.
या अंत्यसंस्कारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपस्थित राहण्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.








