देवरी फाटा येथे चारचाकी अपघात चालक किरकोळ जखमी, लाईट आणि सूचना फलक नसल्याने वाढले अपघात
अकोट प्रतिनिधी: निलकंठ वसु पाटील
सावनेरहून अकोलाकडे जात असलेली एमएच 31 ईए 8579 क्रमांकाची चारचाकी गाडी देवरी फाटा येथील राजराजेश्वर हॉटेलजवळील डिव्हायडरवर जोरदार आदळली. गाडीत दोन व्यक्ती प्रवास करत होते. सुदैवाने जीवितहानी टळली असून, चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
गाडीचे मालक सुनील रोहणकर असून, या अपघाताचे मुख्य कारण परिसरात सूचना फलक व रस्त्यावरील लाईटचा अभाव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
महामार्गावर देवरी फाटा परिसरात रात्री प्रकाश व्यवस्था नसल्याने आणि कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे वारंवार अपघात घडतात. याबाबत नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
यासंदर्भात देवरी ग्रामपंचायतीचे मा. सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. [योगेश गायकवाड] यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
> “आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी आणि मौखिकरित्या सांगितले आहे की येथे लाईट आणि सूचना फलक तातडीने बसवावेत. परंतु अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे.”
अपघातातील व्यक्ती हे माजी गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.









