“माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी — महिला व बालविकास विभागाचे आवाहन
अकोला, प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
श्री. पुसदकर यांनी सांगितले की, “योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी दि. १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अन्यथा लाभ देण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.”
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे लाभ अखंडपणे मिळावा यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने आपली माहिती अद्ययावत ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.








