दहिहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांची बदली — अकोला पोलिस खात्यात फेरबदल.
अकोट प्रतिनिधी – नीलकंठ वसू
अकोला (दि. ४ नोव्हेंबर २०२५) : अकोला जिल्हा पोलिस विभागात प्रशासनिक कारणास्तव काही प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये दहिहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांची बदली करण्यात आली असून त्यांची नवीन नियुक्ती बातमी लिहीतस्तर माहिती मिळाली नाही
ठाकरे यांच्या जागी गोपाळ महादेव ढोले यांची नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचा आदेश पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या सहीने आज ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाला.
प्रशासनिक कारणास्तव तत्काळ बदली
पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्राप्त आदेशानुसार, सार्वत्रिक बदली २०२५ अंतर्गत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार ही बदली करण्यात आली आहे. दहिहंडा पोलिस स्टेशनमधील ठाणेदार ठाकरे यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले असून, त्यांच्याजागी श्री. गोपाळ ढोले हे नव्या जबाबदारीसह कार्यभार स्वीकारतील.
ठाकरे यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी
ठाणेदार ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात दहिहंडा, गोपालखेड, दहिहंडा फाटा परिसरात वाढत्या अपघात, गुन्हेगारी आणि सामाजिक वादांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. गावागावात पोलीस जनसंपर्क वाढविणे, युवकांमध्ये कायद्याविषयी जागृती निर्माण करणे आणि वृक्ष लागवड स्थानिक समस्या त्वरित सोडविणे या दृष्टीने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवीन ठाणेदार गोपाळ ढोले यांच्याकडून अपेक्षा
गोपाळ ढोले हे काटेकोर तपास आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी पूर्वी विविध ठिकाणी कार्यरत असताना गुन्हे उघडकीस आणणे, सामाजिक संवाद वाढविणे आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दहिहंडा पोलिस ठाण्यात नवे चैतन्य येईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिकांकडून प्रतिक्रिया
दहिहंडा परिसरातील नागरिकांनी ठाकरे यांची बदली झाली कळताच नागरिक यांनी भावना व्यक्त केल्या “ते जनतेचे ठाणेदार होते,” असे मत ग्रामस्थांनी मांडले. तर नवीन ठाणेदार गोपाळ ढोले यांच्या स्वागताची तयारी स्थानिक पातळीवर सुरू आहे.
📜 बदली आदेशाचे तपशील:
क्रमांक: पोअअक/स्थापना-३३/२०२५
दिनांक: ०४/११/२०२५
प्रेषक: पोलिस अधीक्षक, अकोला
प्राप्तकर्ता: संबंधित अधिकारी व पोलिस विभाग
🗞️ संक्षेपात:
🔸 पुरुषोत्तम ठाकरे — दहीहंडा ठाणेदार बदली
🔸 गोपाळ ढोले — नवीन ठाणेदार, दहिहंडा पोलिस स्टेशन
🔸 आदेश दिनांक — ४ नोव्हेंबर २०२५
🔸 कारण — प्रशासनिक फेरबदल








