श्री गुरुदेव दत्त पालखी मात्रा
गुरुतत्व प्रदीप आयोजित भव्य पालखी रथयात्रा श्रीक्षेत्र कारंजा लाड ते श्रीक्षेत्र गाणगापूर
हिंगोली .श्रीहारी आभोरे पाटील.
परभणी वरून वसमत कडे गुरूवार रोजी ही भव्य पालखी रथयात्रा वसमत शहरात आगमन होनार आहे या साठी दिनांक 6 गुरुवार रोजी येत असलेल्या या पालखी सोहळा रथयात्रेचा वसमत शहरातील कार्यक्रम गुरुतत्त्व प्रदीप वसमत, यांनी खालील प्रमाणे सुनियोजित केला आहे. परभणी येथून येत असलेल्या पालखी रथयात्रा वसमत शहरात 6 रोजी रोज गुरूवार दुपारी 4=00 दाखल होईल. वसमत शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी रथाचे आगमन होईल. तेथून मोंढा, मार्केट यार्ड रस्त्यावरून मामा चौक, या दिशेने बुधवार पेठ , खीरणी चे झाड शहर पेठ , सत्यनारायण टॉकीज, सत्याग्रह चौक, झेंडा चौक या मार्गे ही पालखी रथयात्रा सरस्वती मंदिर येथे सायंकाळी 6=00 वाजता पोहोचेल. या पालखी मार्गात सर्व वसमत येथील सर्व भाविकांनी श्री स्वामींच्या पालखी रथाचे यथोचित भव्य स्वागत व पूजन करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे व या पालखी सोहळा सेवेचा लाभ घ्यावा.
सायंकाळी 6 =00पासून उत्तरधात 8.30 वाजेपर्यंत श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरण पादुका- दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण इत्यादी सेवेसाठी सरस्वती मंदिर झेंडा चौक वसमत.श्री स्वामी महाराजांना भिक्षा अर्पण करण्याची अपूर्व संधी वसमतकरांना चालून आली आहे. सरस्वती मंदिर येथील पारायणात मागितलेल्या भिक्षे व्यतिरिक्त वसमतकर इतर धान्य व द्रव्य स्वरूपातील भिक्षा येथे अर्पण करू शकतात.सरस्वती मंदिर येथे प. पू. श्री मकरंद महाराज (पिठाधीपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी) यांचे प्रवचन, पंचपदी व प्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा या पालखी रथयात्रेची माहिती सर्वदूर पोहोचवून सर्व वसमतकरांनी श्री स्वामी महाराजांच्या स्वागत, दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण सेवेत सहभागी व्हावे व पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामी कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुतत्त्व प्रदीप परिवार वसमत यांनी केले आहे.
भाविकांनी घेतलेली भिक्षा पात्र यावेळी जमा करून आपला प्रसाद घ्यायचा आहे श्री श्याम लांडगे 9850512158 श्री श्याम कुरुंदकर 9764912900









