पुर्णा सहकारी साखर कारखान्यामार्फत A.I. तंत्रज्ञान ऊस उत्पादक सभासद शेतकरी बारामतीला रवाना
हिंगोली .श्रीहारी अंभोरे पाटील
(हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखाना चे ऊस उत्पादक सभासद शेतकरी हे बारामती येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीसाठी रवाना पुर्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊसविकास योजनेअंतर्गत A.I. तंत्रज्ञान (कृत्रिम बुध्दीमत्ता) मध्ये सहभाग घेतलेल्या सभासदांसाठी ऊस शेतीविषयी एक दिवशीय प्रशिक्षण व प्रक्षेत्र अभ्यास दौरा आयोजित केला असून या प्रशिक्षणसाठी आज दि.03/11/2025 रोजी सभासद रवाना झाले आहेत. सदरील सभासदांसाठी कारखान्यामार्फत बारामती येथे जाणे – येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या सभासदांना कारखान्याचे सन्मा.अध्यक्ष मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर साहेब, उपाध्यक्ष डॉ.सुनिलराव कदम साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सन्मा.संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री अमोल पाटील, अधिकारी उपस्थित होते.









