मराठा महासंघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी विकी खुमकर यांची निवड
अकोला प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे पवन उर्फ विकी खुमकर यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समाजकारणात सतत सक्रिय असलेले व अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे खुमकर हे मराठा समाजाच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीने
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.









