सय्यद यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून वाढवला जिल्हा पोलीस दलाचा गौरव : डॉ. उद्धव शिंदे .
प्रतिनिधी -सारंग महाजन
स्नेहबंध सोशल फाउंडेशनतर्फे सय्यद यांचा सत्कार
अहिल्यानगर – जिल्हा पोलीस दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक अनवरअली सय्यद यांनी ५५ व्या वर्षी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पोलिस दलाचा गौरव वाढवला. स्पर्धांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुधारते, त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि सांघिक भावनेला प्रोत्साहन मिळते आणि त्यांना तणावमुक्त राहण्यास मदत होते. सय्यद यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढवला आहे. त्यांचे हे यश तसेच इतर पोलिसांसाठी प्रेरणादायी, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले
सूरत येथील वीर नर्मदा युनिव्हर्सिटीत झालेल्या नॅशनल वेटरनस मास्टर गेम्स स्पर्धेत जिल्हा पोलीस दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक अनवरअली सय्यद यांनी धावण्याच्या प्रकारात यांनी गट ५५ वयोगटात सुवर्ण पदक पटकावले. याबद्दल स्नेहबंध फाउंडेशनतर्फे डॉ. उद्धव शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते.
सय्यद यांनी ४४ हजार १०० मीटर रिले धावण्याच्या प्रकारात उत्कष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्ण पदक मिळवले.
पोलीस उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.








