मुंबई,येथे शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न
श्रीहरी अंभोरे पाटील
आज मुंबईत येथे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती होऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात संपुर्ण महाराष्ट्रात राज्यातील निवडणुकी मधिल रननिती संदर्भात महाराष्ट्र राज्यातील मतदार व पक्षाची भुमिका या संदर्भात बैठक संपन्न झाली

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. शशिकांतजी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उप अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या व अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांची रणनीती, जनतेच्या प्रश्नांवरील पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक बळकटी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन करत सांगितले की, पक्षाने एकसंधतेने कार्य करून शिव – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करावा, तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज असून, जनतेच्या विश्वासाचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला









