अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता
हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील
थेट खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा
ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपये निधी वितरित करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपये मदतीचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. ई-केवायसी अभावी प्रलंबित शेतकरी लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 37 हजार 873 शेतकऱ्यांना 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरी








