मध्यस्थी मंडळाचा निष्काम सेवाभाव वंदनीय आहे
———————————————
*मध्यस्थी वधू-वर परिचय मेळाव्याला समाज बांधवांचा व्यापक प्रतिसाद
———————————————
आकोटः-निलकंठ वसु पाटील
समाजातील मुलामुलींचे विवाह योग जुळवून आणण्यासाठी मध्यस्थी करणा-या व्यक्ती आता पुढे येत नाहीत असे असतांना मध्यस्थी विवाह मंडळ गत १३वर्ष त्यासाठी निष्काम सेवा भावनेने काम करत आहे .मंडळाचे हे कार्य वंदनीय आहे.हे कार्य वृद्धींगत होण्यासाठी समाज बांधवानी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन जेष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर यांनी येथे केले.*
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा कार्यगठीत मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाच्या वतीने श्रद्धासागर येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे उद् घाटक म्हणून
नानासाहेब बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले होते. याप्रसंगी समाज सुधारक महादेवराव भुईभार ,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, कृउबासचे संचालक बाबाराव इंगळे, प्रामुख्याने उपस्थित होते.
संत श्रेष्ठ वासुदेव महाराज यांचे विचारधारेवर मध्यस्थी सारखा उपक्रमातून समाजाची गरज ओळखली जाते. मोठ्या निष्ठेने श्रद्धासागर येथे होत असलेले कार्य हे समाजाभिमुख झाले आहे अशा शब्दात नानासाहेबांनी मध्यस्थी मंडळाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी गुरुमाऊलींचे विचारधारा व समाज हितैषि कार्य संस्था पुढे चालवित आहे. सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचे कार्य केले ..हाच वारसा पुढे चालवितांना धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक बांधिलकीतून संस्था पुढे जात आहे. हे कार्य आणखी वृंद्धींगत व्हावे यासाठी या संस्थेला यथोचित सहकार्य करावे असे विनंती केली.मध्यस्थीचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी अतिथी चे स्वागत केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे यांनी करुन दिला. मध्यस्थीचे सहसचिव नंदकिशोर हिंगणकर यांनी मध्यस्थीच्या कार्याचा आढावा सादर करुन विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक अजय अरबट यांनी तर आभारप्रदर्शन सहकोषाध्यक्ष
राममूर्ती वालसिंगे यांनी केले.
*परिचय सत्रात युवक युवतीचा उत्स्फूर्त सहभाग*
मध्यस्थी वधू-वर मेळाव्याला पुणे मुंबई,नाशिक, नागपूर भोपाळ इंदौरसह व-हाडातील सर्वजिल्ह्यातून आलेल्या युवक-युवती व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व परिचय सत्रात आपला परिचय दिला, परिचय सत्राचे अध्यक्षस्थानी प्रा प्रदीप चोरे होते. मध्यस्थीचे मार्गदर्शक बापुराव ढोबळे नागपूर यांनी युवक युवतींना विवाहविषयक उद्बोधन केले. संचालन सौ.ज्योतीताई कुकडे यांनी केले
याप्रसंगी बुलढाणा शाखेचे अध्यक्ष अमृतराव वाघ,पुणे शाखेचे अध्यक्ष महादेवराव सावरकर,सचिव वैभव टेकाडे, अमरावती शाखेचे अध्यक्ष बाळकृष्ण आमले, यवतमाळ शाखेचे अध्यक्ष विलासराव खेडकर,कारंजा वाशिम शाखेचे अध्यक्ष समाधान उपाध्ये, दर्यापूर शाखेचे अध्यक्ष विलासराव पोटे, संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, विश्वस्त अनिल कोरपे, अशोकराव पाचडे, दिलिप हरणे, गजाननराव दुधाट,प्रा वाल्मिक भगत,मंडळाचे सदस्य नागोराव कुलट,प्रा.साहेबराव मंगळे,नागोराव वानखडे , मधुकरराव पुंडकर,वृंदाताई मंगळे,सुरेश जुनारे ,नंदकिशोर जांभुळकर, पुरुषोत्तम कडू,डी.ओओ म्हैसणे, विनायकराव कुकडे, रामदास मंगळे, प्रकाश कुकडे,संजय मगर, सुधाकरराव हिंगणकर,विजय वानखडे,दिपक पाटील, महेंद्र शेलकर, प्रकाश साबळे, कुलदीप पोटे, पुरुषोत्तम गावंडे, रावसाहेब साबळे, विलासराव पोटे,ज्ञानदेवराव वनारे, पंजाबराव राऊतसह समाज बांधव उपस्थित होते.
या आयोजनात भास्करराव देशमुख, दत्तात्रय तळोकार, भास्करराव इंगळे, प्रकाश बिहाडे,देवेंद्र फोकमारे, हरिश्चंद्र मारोडे,रत्नाकर रेळे, अनिल गोंडचवर,गोपाळ वानखडे,अनिल सावरकर, प्रविण चोपडे,धनंजय मंगळे, प्रशांत धाबे,अश्विन हिंगणकर,अजय ढोले, संदिप कुलट, संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर,दिलिप कुलट, महादेवराव बोरोकार यांचा विशेष सहभाग होता.
——————————
प्रेस नोट









