अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदी राहुल जयसिंग भोंडे यांची नियुक्ती करण्यात आली
प्रतिनिधी शाम जगताप
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी राहुल जयसिंग भोंडे, महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, पुरंदर तालुका महिला उपाध्यक्ष सौ सोनाली दोडके, जेजुरी शहर उपाध्यक्ष अनिल भोंडे, महिला सचिव सौ कविता भोंडे,यांची नियुक्ती
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी राहुल जयसिंग भोंडे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी त्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख दत्ता नाना भोंगळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी राहुल भोंडे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी संस्थापक सचिव अतुल पवार, सल्लागार मंगेश गायकवाड, खजिनदार इजाज पानसरे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन दिलीप बापू गुरव, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलाणी, महिला प्रदेशाध्यक्षा सुजाता गुरव, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. राणी भंडलकर, जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सौ. मयुरी ताई जरांडे, जेजुरी शहर महिला अध्यक्षा सौ. योगिता ताई मोरे, जेजुरी शहर उपाध्यक्षा दिपाली ताई कुंभार, सासवड शहर अध्यक्ष सचिन वढणे, उपाध्यक्ष समीर बागवान, कार्याध्यक्ष महेश दिवेकर,सुमित दादा पवार ,सौ रोहिणी खुडे, सौ पूजा दोडके, सौ सपना दोडके, सौ वर्षा साळवे, सौ मीरा सकट, सौ पल्लवी दोडके, सौ रेशमा दोडके,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.








