गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक, कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाणेची कामगिरी, एकूण 38 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत..!! (कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक संसद इसाम बेकायदेशीर गांजा विक्री करीत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत राजारामपुरी पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे पथकांला कारवाईबाबत आदेशित करण्यात आले असता. राजारामपुरी पोलिसांनी शेंडा पार्क ते आर.के.नगर चौक शेजारील जुन्या बंद पडलेल्या जकात नाक्याजवळ जावुन पोलिसांनी छापा टाकला असता सदर संशयित इसम नामे. मयूर मोतीलाल मिणेकर ( वय 24) रा. अण्णा पार्क रेणुका नगर पाचगांव ता. करवीर जि. कोल्हापूर ) हा त्याच्या पाठीवरील असलेल्या सॅकमधून गांजाची विक्री करीत होता. या कारवाईत पोलिसांनी जवळपास एकूण 01 किलो 675 ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल फोन असा एकूण 38675/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चु उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण स.पो.नि.भारत साळुंखे कृष्णात पाटील संदीप सावंत सत्यजित सावंत नितीन बागडी सचिन पाटील सुशांत तळप अमोल पाटील सारिका गौतम आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. राजारामपुरी पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलीस ठाणेच्या हद्दीमधील अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.








