अखेर सखाराम कुलकर्णी यांच्या कार्याला मोठे यश
संपादकीय
जनता शिक्षण मंडळाचा तोतया व स्वयंघोषित अध्यक्ष जाधव यांनी मुख्याध्यापक पदी नियुक्त केलेल्या देवरे व गौड यांची शिक्षणाधिकारी नांदेड यांचे कडून हकालपट्टी
नांदेड -जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमदरी ता. मुखेड जि. नांदेड संस्थेचे स्वयंघोषित व तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी नियुक्ती केलेले मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी त्यांची हकालपट्टी करून संस्थेच्या तिन्ही शाळेत सेवा जेष्ठता व नियमाप्रमाणे प्रभारी मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या केल्या .यामुळे शिक्षकवर्गात समाधानाचे वातावरण पसरले व शिवाजी जाधव यांच्या हम करे सो कायदा संपुष्टात आला.
ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक तथा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे गैर अर्जदार व अजीव सभासद सखाराम कुलकर्णी यांनी संस्थेच्या तोतया व स्वयं घोषित अध्यक्ष शिवाजी जाधव यांचा गैर कारभार चव्हाट्यावर आणत आहेत व त्यांचे गैर कामाविरुद्ध न्यायालय व शासन स्तरावर न्याय मागत आहेत. जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या सन २०१५ ते २०२० चा फेरफार बद्दल अर्ज क्र.२८२/१६ हा धर्मादाय उप आयुक्त नांदेड यांनी रद्द केला. त्याचबरोबर शिवाजी जाधव यांनी बेकायदेशीरपणे घेतलेले मुलगा व पत्नी सह अनेक सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे आता संस्थेवर सन २०१५ नंतर अधिकृत व कायदेशीर कार्यकारिणी मंडळ राहिले नाही. तरी देखील तोतत्या, स्वयंघोषित अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी संस्थेच्या शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथे देवरे एस.एम. व नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे गौड एम .एस. यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली होती .ही नियुक्ती नियमबाह्य असून तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केली .ही गंभीर बाब असल्याचे कुलकर्णी यांनी शिक्षणाधिकारी (मा) यांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी कायद्याच्या कसोटीवर सदर प्रकरणाची कसून तपासणी केली असता तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या बनावट व बेकायदेशीरपणा लक्षात आल्यावर शिक्षणाधिकारी (माध्य) यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे व्यापक हिताचा विचार करून विचार करून शिवाजी जाधव यांनी नियुक्त केलेल्या देवरे व गौड या मुख्याध्यापकांची हकालपट्टी केली व नरसिंह विद्या मंदिर उमरदरी येथे देशपांडे एस. पी., शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथे रवी जाधव व नरसिंह विद्यामंदिर नांदेड येथे व्ही. एम. गव्हाणे यांची प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती करून त्यांना तात्पुरते अधिकार दिलेत. सूत्राकडून मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार सिडको शाळेचे उपमुख्याध्यापक रवी जाधव यांची व उपमुख्याध्यापक पदावर झालेली नियुक्ती व प्रथम नियुक्ती बेकायदेशीर असल्यामुळे सखाराम कुलकर्णी यांनी सदर नियुक्तीच्या विरोधात कंबर कसली असून हे प्रकरण यासाठी एस.आय.टी.कडे दिले आहे. तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या गैरकायदेशीर कारभार संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची ग्वाही आयोजित केलेल्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बैठकीत कुलकर्णी यांनी बोलल्याचे विश्वासनीय वृत्त असल्याचे समजते.










