भायखळा वाहतूक पोलिसांची धमाकेदार कामगिरी
भायखळा वाहतूक विभागातील अंमलदाराची प्रशंसनिय कामगिरी
मुंबई:प्रतिनिधी मुकूंद मोरे
भायखळा वाहतूक विभागाच्या ग्रुपवर एमटीपी हेल्पलाइन येथून मयुरेश बिल्डिंग समोर,दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथे दुचाकी व चार चाकी वाहने फूटपाथवर पार्किंग असून येणारा जाणाऱ्यांना त्रास होत आहे असा कॉल प्राप्त झाला होता. सदर कॉलचे अनुषंगाने भायखळा वाहतूक विभागाचे रायडर पोलीस शिपाई 171281 किरण सूर्यवंशी हे रवाना झाले होते. सदर ठिकाणी ते कारवाई करत असताना तेथील काही लोकांनी त्यांना सांगितले की आस्था नर्सिंग होम चे केबिनमध्ये एक मुलगा एक मुलीला चाकूने मारहाण करत आहे. सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन रायडर किरण सूर्यवंशी हे तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी तेथील पीडित मुलीलाआरोपी मुलाच्या ताब्यातून प्रयत्न करून सोडवले व तिला नर्सिंग होम च्या बाहेर काढले. ती जखमी अवस्थेत असल्याने त्यांनी समय तत्परता दाखवून क्षणाचा ही विलंब न करता त्या मुलीला टॅक्सी मध्ये घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, राणीबाग या ठिकाणी घेऊन आले. सदर मुलीवर तेथे प्राथमिक उपचार केले. काळाचौकीचे अधिकारी व अंमलदार पुढील उपचाराकरिता जखमी महिलेला जे जे हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्याकरता घेऊन गेले. असल्याची माहिती समोर आली आहे
तसेच सदर घटनेत हल्ला करणारा व्यक्ती याने स्वतःच्या अंगावर देखील वार करून घेतले असून त्याला केईएम हॉस्पिटल येथे काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मदतीने घेऊन गेले आहेत. अशी माहिती समोर येत आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे हॉस्पिटल या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त मॅडम, झोन 4, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळाचौकी पोलीस ठाणे यांनी भेट दिली.
सदर मुलीवर सर जेजे हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून पुढील तपास काळचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुकुंद मोरे यांना आदरपूर्वक माहिती सादर
(जितेंद्र वरे)
प्रभारी पोलीस निरीक्षक
भायखळा वाहतूक विभाग










