वरुर जिल्हा परिषद सर्कलमधूनभाजप पक्ष यांनी जबाबदारी दिल्यास सौ. अर्चना मिलिंद गायकवाड निवडणुकीच्या तयारीत;
प्रतिनिधी —निलकंठ वसु पाटील
वरुर जिल्हा परिषद सर्कल मधून देवरी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व भाजप सहकार आघाडी तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा ओबीसी अकोला ग्रामीण कार्यकारिणी सदस्य श्री. मिलिंद गजाननराव गायकवाड यांच्या पत्नी सौ. अर्चना मिलिंद पा. गायकवाड यांनी भाजप पक्ष आणि वरिष्ठ नेते यांनी जबाबदारी दिल्यास जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दिली.
श्री. गायकवाड हे तालुक्यातील तसेच परिसरातील एक प्रखर सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा सर्कल मधील प्रत्येक गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क व मित्र परिवार आहे.तसेच श्री मिलिंद गायकवाड हे उत्कृष्ट क्रिकेट पटू, आरोग्य सेवक म्हणून त्यांची ख्याती आहे.
विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव पाहता परिसरातील कार्यकर्ते आणि जनतेतून सौ. अर्चना गायकवाड यांना निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.
सौ. गायकवाड यांनी सांगितले की, “कार्यकर्ते आणि जनतेचा आग्रह लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढवेन आणि विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”








