चौहट्टा बाजारात रेती माफियांचा धुमाकूळ महसूल यंत्रणा मौन
अकोट प्रतिनिधी: निलकंठ वसु पाटील
अकोट तालुक्यातील चौहट्टा बाजार परिसरात अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या रेती माफियांना महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी या सर्व अधिकारी वर्गाकडून दरमहा ठराविक हप्ता घेण्यात येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे सर्व अधिकारी या बेकायदेशीर कृत्याकडे डोळेझाक करून बसले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “यांच्या वर कुणाचा अंकुश नाही. महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी जणू स्वतःचा कायदा तयार केला आहे — हम करे सो कायदा!” अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रकाराकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.








