विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर
दोन पिस्तुल व एक काडतुस जवळ बाळगणा-या आरोपीस केले जेरबंद
संपादक संतोष लांडे
विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलीस अंगलदार पेट्रोलींग करीत असत्ताना पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की, राजेंद्रनगर भाग, विश्रबाग पुणे येथील सार्वजनिक रोडच्या कडेला एक इसम संशयीतरित्या थांबलेला आहे. सदर अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन तपास केला असता एक इसम हा संशयितरित्या थांबलेला मिळुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्याला नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मयुर सचिन भोसले वय २० वर्षे, रा. पापळ बस्ती, गणपत नगर बिबवेवाडी, पुणे असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे १,००,२००/-रु. किं. चे दोन गावठी पिस्टल व एक काडतुस गिळून आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९०/२०२५ आर्म अॅक्ट क. ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.
सदरची कारवाई गा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर श्री. कृषीकेश रावले, मा. सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरुण घोडके यांचे सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भासेले, जाकीर मणियार, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड व राहुल माळी यांनी केलेली आहे.








