🚦 संयुक्त ट्रॅफिक ॲडव्हायझरी
दिनांक : 23 ऑक्टोबर 2025
—
📢 महत्त्वपूर्ण सूचना :
दीपोत्सव समाप्तीनंतर 24 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खालील महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ अपेक्षित आहे —
1️⃣ बंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (NH-48)
कोल्हापूरहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढेल.
2️⃣ नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 (NH-50)
नाशिक व परिसरातून चाकणमार्गे पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढेल.
3️⃣ सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 (NH-65)
सोलापूरहून पुणे व परिसराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
—
📍 वाहतूक विभागाच्या महत्त्वाच्या सूचना :
1. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करावा.
2. महामार्गावरील गर्दीचे प्रमाण पाहून प्रवासाचे नियोजन करावे.
3. पीक अवर्समध्ये प्रवास टाळावा — सकाळी ७ ते ११ व संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान.
4. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.
5. पोलिसांनी दिलेल्या वाहतूक सूचनांचे काटेकोर पालन करावे.
6. वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा.
—
👮♂️ संयुक्तरित्या जारी :
पोलीस अधीक्षक, राज्य महामार्ग, पुणे
पोलीस आयुक्त (वाहतूक), पिंपरी चिंचवड
पोलीस उपायुक्त (वाहतूक), पुणे शहर
—









