एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एक हात मदतीचा” टीमकडून रुग्णांसोबत दिवाळी स्नेह, संवेदना आणि आनंदाचा आगळा उत्सव!

एक हात मदतीचा” टीमकडून रुग्णांसोबत दिवाळी स्नेह, संवेदना आणि आनंदाचा आगळा उत्सव!

गडचिरोली मनोज उराडे जिल्हा प्रतिनिधी:-

दिवाळी म्हटली की उजेड, फटाके, गोडधोड पदार्थ आणि आप्तांच्या सहवासात साजरा होणारा आनंद पण काहीजणांसाठी हा सण रुग्णालयाच्या चार भिंतीतच मर्यादित राहतो. अशा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटवण्यासाठी *“एक हात मदतीचा”* ग्रुप दरवर्षी राबवतो एक हृदयस्पर्शी उपक्रम ‘रुग्णांसोबत दिवाळी’ या उपक्रमाची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे देणगी किंवा डोनेशन घेतले जात नाही. सर्व खर्च सदस्य स्वतःच्या योगदानातून करतात. समाजाप्रती खरी जबाबदारी आणि संवेदना अशा प्रकारे व्यक्त करणे म्हणजेच खरी दिवाळी! २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, *जिल्हा रुग्णालय, गडचिरोली* येथे ही अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशात, फुलांच्या सुगंधात आणि गोड पदार्थांच्या स्वादात रुग्णालयाचे वातावरण क्षणभरासाठी आनंदमय बनले होते. रुग्णांच्या चेहऱ्यावरचे स्मित म्हणजेच या उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरले.

एका रुग्णाने भावुक होत सांगितले “आम्ही घरी जाऊ शकलो नाही, पण ‘एक हात मदतीचा’ टीमने हॉस्पिटलमध्येच दिवाळी कशी साजरी करायची ते दाखवून दिलं.” या उपक्रमासाठी उपस्थित होते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनीष मेश्राम, डॉ. धुर्वे, तसेच *“एक हात मदतीचा”* टीमचे समर्पित सदस्य स्नेहल पद्मा दिलीप संतोषवार, जयेश देशमुख, शरद गिऱ्हेपुंजे, मंगेश मुनघाटे, रवी भंडांगे, मुकेश बरदाळकर, अबुल बंबोळे, संदीप मोटघरे, स्वप्नील श्यामकुवर, गोविंद भाऊ दिघोरे, पवन संतोषवार, विलास दिवटे भाऊ, आकाश चौधरी, साहिल बावणे, अक्षय इंगळे, सनी बारसागडे, लीलाधर हेटकर, विकास काबेवार, अमोल ककनालवर आणि अन्य सदस्य. या प्रसंगी प्रमोद शेरकर सर व बालु येरोजवारयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मदतीचा हात देऊन सामाजिक संवेदनांचा सुंदर संदेश दिला. “एक हात मदतीचा” या संस्थेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिवे लावण्यात नाही, तर आनंद वाटण्यात आणि मनं उजळण्यात आहे. हीच खरी दिवाळी ज्यात प्रत्येक चेहऱ्यावर हसू आणि प्रत्येक हृदयात प्रकाश झळकतो!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link