एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आंबेगाव पोलिसांची दमदार कामगिरी

बतावणी करून मंगळसुत्र घेवून जाणाऱ्या परराज्यातील महिलांना २४ तासाच्या आत ओळख पटवून मंगळसुत्र केले हस्तगत.
आंबेगाव पोलिसांची दमदार कामगिरी.

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव

आंबेगाव (कात्रज ):आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १५/१०/२०२५ रोजी दुपारी १३:१५ वा सुमारास ओम किराणा माल दुकाना समोर साई मित्र मंडळ गणपती मंदिरा शेजारी संतोषनगर कात्रज पुणे अनोळखी महिलांनी फिर्यादी यांना पिवळे धातुचे मनी देवून ते सोन्याचे आहे असे भासवून ते फिर्यादी यांच्या मंगळसुत्रापेक्षा जास्त वजनाचे आहेत असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र घेवून पळून गेल्याने आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २६८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर महिलांचा आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज ते सासवड मार्गातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर आरोपीत महिला या सासवड येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत आरोपी महिला राहत्या घरी असल्याचे माहिती मिळाल्याने पोउपनि मोहन कळमकर व पोलीस अंमलदार अजय कामठे, शिवाजी पाटोळे, महिला पोलीस अंमलदार दिक्षा मोरे असे त्यांच्या राहत्या घरी जावून सदर महिलांना त्यांना ताब्यात घेतले. महिला नाव १) आशाबेन मंगाभाई सरवय्या, वय ५० वर्षे, रा. नदी पत्रा जवळील पत्र्याचे रुम मध्ये भाडयाने जुना कोडीत रोड, तरकारी मार्केट जवळ, सासवड, जिल्हा पुणे मुळ रा. ढोला झोपडपटटी, भावनगर, गुजरात व २) सोनूचेन आकाशभाई सरवण्या, वय ३० वर्षे, रा. सदर यांना गुन्हयात अटक करून त्यांच्या कडून फिर्यादी यांचे मंगळसुत्र हस्तगत केले. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस फौजदार शैलेंद्र साठे हे करीत आहेत.

नमुद महिला आरोपीकडून खालील मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे.

१) १,०२,०००/- रु किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे एक चैनचे सोन्याचे दागिण्याचे दोन वाट्या असलेले मणी

 

आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे मपोशि दिक्षा मोरे यांच्या पथकाने केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link